- ग्रामपंचायत टोकरे येथे विविध विकासकामांना गती
- पाणीपुरवठा योजनेचे नवे टप्पे सुरू
- स्वच्छता मोहिमेअंतर्गत नवीन उपक्रम राबविण्यात येणार
- नागरिकांसाठी नवीन सेवा केंद्र लवकरच सुरू
- ग्रामसभा दिनांक १५ डिसेंबर रोजी आयोजित
ग्रामपंचायत टोकरे मध्ये आपले स्वागत आहे
टोकरे - खैरपाडा, ता. वसई, जि. पालघर. गावाची माहिती, विकास कामे आणि नागरिक सेवा आता एकाच ठिकाणी.
माझे गाव, माझी प्रगती
आकडेवारीत ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीची माहिती
ग्रामपंचायत टोकरेची स्थापना दि. १७ एप्रिल २०१२ रोजी झाली. टोकरे-खैरपाडा हि गावे तत्कालीन ग्रामपंचायत कणेर-शिरसाड ह्या गावात समाविष्ट होती. वसई-विरार महापालिकेत समाविष्ट केलेल्या ५० गावांमधून २१ गावे वगळण्यात आली त्यामध्ये महसुली गावे टोकरे व खैरपाडा या गावांचा समावेश होता. सदर दोन महसुली गावांची एकत्रित टोकरे ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली.
ग्रामपंचायत टोकरे हि पेसा कायदा अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीत टोकरेपाडा, सामंतपाडा, पाटीलपाडा, वरठापाडा, पिरकुंडा, खैरपाडा इ. पेसा गाव घोषित झालेले आहेत. येथील बहुसंख्य लोकसंख्या अनुसूचित जमातीची असून वारली, मल्हार-कोळी, आदीम इ. जातीचे लोक येथे राहतात.
अधिक वाचाअंतर माहिती
- वैतरणा स्टेशन
- ५ कि.मी
- विरार स्टेशन
- १० कि.मी
- तालुका अंतर
- १८ कि.मी
- जिल्हा अंतर
- ५५ कि.मी
प्रमुख आकर्षणे
- राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ मुंबई-अहमदाबाद
- श्री. शेषनाग लिंग मल्लिनाथ महाराज मंदिर
- वाघोबा मंदिर
- तुळजाभवानी मंदिर
- अमुल डेअरी दुध उत्पादक संघ
- खैरपाडा धबधबा
नेतृत्व आणि प्रशासन
श्री. रामचंद्र राघो रोज
सरपंच
श्री. विलास अनंता मोरघे
उपसरपंच
श्री. मनोहर दत्तात्रय पाचांगणे
ग्रामपंचायत अधिकारी
विकास कामे
झालेली कामे
स्वच्छता कमिटी
झालेली कामे
केंद्रिय कमिटी ग्रामपंचायतीस भेट देण्यात आली.
झालेली कामे
स्मशानभूमी मध्ये शेड, पाण्याची सोय, सौर दिवे, पोहोच रस्ता, वृक्षरोपण इ.सुविधा
झालेली कामे
धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण .
झालेली कामे
ग्रामपंचायत कडून सहा अंगणवाडी केंद्रातील सर्व मुलांना दप्तर,पाटी व गणवेश यांचे वाटप करण्यात आले.
झालेली कामे
गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे.
हवामान अंदाज
हवामान माहिती येत आहे...
स्रोत: Open-Meteo. हा संगणकीय अंदाज आहे. अधिकृत इशाऱ्यासाठी भारतीय हवामान विभाग पहा.
ग्रामपंचायत टोकरे
टोकरे - खैरपाडा, ता. वसई, जि. पालघर
प्रिय ग्रामस्थ बंधू-भगिनींनो,
ग्रामपंचायत टोकरेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत! गावाची माहिती, विकास कामे, कार्यक्रम, शासकीय योजना आणि नागरिक सेवा येथे आपल्यासाठी एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.
आपल्या सूचना व तक्रारी आम्हाला जरूर कळवा. आपला सहभाग हीच गावाच्या प्रगतीची खरी ताकद आहे.
माझे गाव, माझी प्रगती