अक्षर:
ताज्या घडामोडी
  • ग्रामपंचायत टोकरे येथे विविध विकासकामांना गती
  • पाणीपुरवठा योजनेचे नवे टप्पे सुरू
  • स्वच्छता मोहिमेअंतर्गत नवीन उपक्रम राबविण्यात येणार
  • नागरिकांसाठी नवीन सेवा केंद्र लवकरच सुरू
  • ग्रामसभा दिनांक १५ डिसेंबर रोजी आयोजित
स्थापना: १७ एप्रिल २०१२

ग्रामपंचायत टोकरे मध्ये आपले स्वागत आहे

टोकरे - खैरपाडा, ता. वसई, जि. पालघर. गावाची माहिती, विकास कामे आणि नागरिक सेवा आता एकाच ठिकाणी.

माझे गाव, माझी प्रगती

ग्रामपंचायत टोकरे कार्यालय ग्रामपंचायत टोकरे प्रवेशद्वार
आपले गाव

आकडेवारीत ग्रामपंचायत

२६३८ एकूण लोकसंख्या अ.जा १७ · अ.ज १७८१ · इतर ८४०
४११ एकूण कुटुंबे टोकरे १८३ · खैरपाडा २२८
६.९८ क्षेत्रफळ (चौ. किमी) महसुली गावे: टोकरे, खैरपाडा
४११ शौचालय असलेली कुटुंबे शौचालय नसलेली: ०
पाण्याचे स्त्रोत विहिरी: ५ बोअरवेल: १० नळपाणी योजना: जल जीवन मिशन (काम चालू)
ओळख

ग्रामपंचायतीची माहिती

ग्रामपंचायत टोकरेची स्थापना दि. १७ एप्रिल २०१२ रोजी झाली. टोकरे-खैरपाडा हि गावे तत्कालीन ग्रामपंचायत कणेर-शिरसाड ह्या गावात समाविष्ट होती. वसई-विरार महापालिकेत समाविष्ट केलेल्या ५० गावांमधून २१ गावे वगळण्यात आली त्यामध्ये महसुली गावे टोकरे व खैरपाडा या गावांचा समावेश होता. सदर दोन महसुली गावांची एकत्रित टोकरे ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली.

ग्रामपंचायत टोकरे हि पेसा कायदा अंतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीत टोकरेपाडा, सामंतपाडा, पाटीलपाडा, वरठापाडा, पिरकुंडा, खैरपाडा इ. पेसा गाव घोषित झालेले आहेत. येथील बहुसंख्य लोकसंख्या अनुसूचित जमातीची असून वारली, मल्हार-कोळी, आदीम इ. जातीचे लोक येथे राहतात.

अधिक वाचा

अंतर माहिती

वैतरणा स्टेशन
५ कि.मी
विरार स्टेशन
१० कि.मी
तालुका अंतर
१८ कि.मी
जिल्हा अंतर
५५ कि.मी

प्रमुख आकर्षणे

  • राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ मुंबई-अहमदाबाद
  • श्री. शेषनाग लिंग मल्लिनाथ महाराज मंदिर
  • वाघोबा मंदिर
  • तुळजाभवानी मंदिर
  • अमुल डेअरी दुध उत्पादक संघ
  • खैरपाडा धबधबा
ग्रामपंचायत टोकरे, वसई तालुका

नेतृत्व आणि प्रशासन

श्री. रामचंद्र राघो रोज श्री. रामचंद्र राघो रोज सरपंच

सरपंचांचे मनोगत

प्रिय ग्रामस्थ बांधवांनो,

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने मला आपल्या प्रिय गावाच्या सरपंच पदाची जबाबदारी मिळाली ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ग्रामविकास हा एक सामूहिक प्रयत्न असतो आणि या प्रयत्नात आपण सर्वजण सहभागी झाल्यासच आपले गाव सर्वांगाने विकसित होऊ शकते.

ग्रामपंचायत ही आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी आहे. पारदर्शकता, लोकसहभाग, जबाबदारी आणि विकास या चार तत्त्वांवर आधारित कामकाज करण्याचा माझा प्रयत्न राहील.

आगामी काळात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार निर्मिती, डिजिटल ग्रामपंचायत आणि पर्यावरण संवर्धन अशा अनेक क्षेत्रांत प्रभावी उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

"आपले गाव – आपली जबाबदारी, सर्वांनी मिळून करूया प्रगती."
धन्यवाद!
कार्यक्रम

ग्रामपंचायत कार्यक्रम

वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे. Virar Fata
सर्व कार्यक्रम
शेतकरी बांधवांसाठी

हवामान अंदाज

हवामान माहिती येत आहे...

स्रोत: Open-Meteo. हा संगणकीय अंदाज आहे. अधिकृत इशाऱ्यासाठी भारतीय हवामान विभाग पहा.